HW News Marathi
महाराष्ट्र

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’, वडेट्टीवारांचा पंकजा मुंडेंवर निशाणा

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले. मुंडे यांच्या वारली इथल्या राहत्या घरी या समर्थकांनी आज (१३ जुलै) मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून,

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना धीर देत राजीनामे देऊ नका, असा आदेश दिलाय. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे फेटाळले आहेत. त्याचबरोबर कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवलंय.

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचं त्यांनीच ठरवावं

जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी महाभारतचं उदाहरण दिलं. पंकजा यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय. ‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचं त्यांनीच ठरवावं. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ’, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांना टोले लगावले आहेत.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवलंय. पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.

आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही

“आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू”. माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले आहे. पंतप्रधानांनी मला झापल्याचं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसं काही दिसतं का? मला पंतप्रधानांनी कधी अपमानित केले नाही. राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले नाही”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरन्यायाधीशांचे तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

Aprna

संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करा; पेगॅसस प्रकरणी शिवसेनेची मागणी

News Desk

‘केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा’, नाना पटोलेंचं आवाहन!

News Desk