HW News Marathi
महाराष्ट्र

काय म्हणते ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर घेऊन उभी राहणारी तरुणी…

मुंबई | जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्लाच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावरी विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला. या आंदोलनाच्या वेळी काश्मीर मुक्त करण्याचे पोस्टर घेऊन एक तरुणी उभी होती. त्या पोस्टरवर ‘फ्री काश्मीर’ असे लिहिलेले होते. पोस्टरवरील या वाक्यामुळे सर्वांचे लक्ष या मुलीकडे लागले होते. या पोस्टरचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले.

यानंतर राज्याच्या राजकारणात या पोस्टरची चर्चा रंगली होती. या प्रकारनंतर आंदोलनात पोस्टर घेऊन उभे असलेल्या मुलीनेच स्पष्टीकरण दिले. मात्र, हे फ्री काश्मीरचे पोस्ट हे काश्मीरमधील परिस्थितीला उद्देशून होते. काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा, संचारबंदी अन् सरकारचे नियंत्रण हटविण्यासाठी होते, असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.

मेहक मिर्झा प्रभू असे या मुलीचे नाव असून तीने फेसबुकवरुन हे स्पष्टीकरण दिले. या तरुणींने युट्युबवर याबाबत एक व्हिडीओ पोस्टसंदर्भातील तिने तिची बाजू स्पष्ट केली. पोस्टर दाखवणारी आणि आंदोलनात सहभागी झालेली मेहक प्रभू ही तरुणी म्हणाली, “मी भारताची नागरिक या नात्याने जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाले होते. तेथे अनेक तरुण वेगवेळे पोस्टर तयार करत होते. त्यात देशातील विविध प्रश्नांवर पोस्टर तयार केले जात होते. तेथेच काश्मीरचे हे पोस्टर होते. ते पाहून माझ्या मनात काश्मीरवर लादलेले निर्बंध आठवले. कारण आम्ही येथे नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांसाठी जमलो होते. मागील ५ महिन्याहून अधिक काळापासून काश्मिरमध्ये अनेक गोष्टींवर बंदी आहे. म्हणूनच मी काश्मिरच्या नागरिकांनाही संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावा ही मागणी करण्यासाठी मी ‘फ्री काश्मीर’ हे पोस्टर दाखवले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pune Wall Collapse : सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, तर जखमींना २५ हजार

News Desk

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि विद्यार्थ्यांचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन

Aprna

महाराष्ट्रातील ‘या’ सहा महिलांना मिळणार ‘नारी शक्ती’ पुरस्कार

News Desk