पुणे | शिवसेना नेते संजय राठोड यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठं विधान केलंआहे. येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचं चंद्रकांतपाटील यांनी सांगितलं. मात्र, या मंत्र्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळेठाकरे सरकारमधील कोणता मंत्री राजीनामा देणार? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
काल (६ एप्रिल) प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे. येत्या आठ दिवसात तिसऱ्यामंत्र्याचा राजीनामा होणार आहे. तो मंत्री कोण आहे, हे तुम्हीच शोधा, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच तुमच्याकर्माने तुम्हीच मरणार आहात, अशी टीकाही त्यांनी केली आहे. 36 बॉलमध्ये २ विकेट उरलेल्या विकेटचं काय? उरलेल्यांची रांगचं लागणार आहे. बाकीच्यांठी रांग लागणारआहे. तुमच्या कर्माने तुम्ही मरणार आहात, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या यावक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “प्रसाद लाड म्हणाले की देवेंद्रफडणवीस एका बॉलमध्ये ४ विकेट घेतात. त्यांना सांगू इच्छितो की नो बॉल जर पडला तर महाविकासआघाडी सरकारमध्ये असे फलंदाज आहेत की त्या नो बॉलवर पवेलियनच्या बाहेर ६ मारु शकतात. इतकंच नाही तर तुमच्या बॉलरच्या हाती चुकुनही कुठल्या मॅचमध्ये बॅट येणार नाही अशीव्यवस्था बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी करुन ठेवली आहे”, असं मिटकरी यांनी म्हटलं असून भाजप-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांनी क्रिकेटच्या भाषेत प्रत्युत्तर देताना दिसत आहे.
सांभाळून बॉलिंग टाकायला लावा प्रसादजी, चुकुन नो बॉल पडला ना तर इकडून सुपर सिक्सर बसेल..
कारण ईकडे कसलेले फलंदाज आहेत, म्हणून जरा सांभाळून!! @PrasadLadInd@TV9Marathi@zee24taasnews@abpmajhatv@saamTVnews pic.twitter.com/7aaVTQRX6P— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 6, 2021
स्वबळाचा नारा
भाजपचा काल वर्धापन दिन होता. त्यामुळे आम्ही सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढून चांगलं यश मिळवलंआहे. त्यामुळे या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही २०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूकस्वबळावर लढणार आहोत. कुणाच्याही कुबड्या आम्हाला नकोत. अर्थातच आमचे सहयोगी पक्षआमच्यासोबत असतीलच, असंही तेम्हणाले. स्वबळावर लढून राज्यात सरकार आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.