HW News Marathi
महाराष्ट्र

“नितेश राणेंच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही” – अनिल परब

मुंबई। एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरून राज्यात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात या आझाद मैदानातील आंदोलनाचं नेतृत्व होत आहे. आणि यात आंदोलनात आज भाजपचे आमदार नितेश राणे सहभागी होऊन घेऊन राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधलाय. मात्र या सगळ्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारलं तर, परिवहन मंत्र्यांकडून विचारण्यात आलय, कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, असं प्रतिउत्तर परब यांनी दिल.

कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल

कोण नितेश राणे? म्हणत अनिल परब म्हणाले की त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही, तसंच कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी यावेळी केलाय. याबरोबरच कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल आणि जे अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अस परब म्हणालेत.

संप भडकवण्याचे काम

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर दोघेही संप भडकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे एसटी आणखी खड्ड्यात जाईल, असे वागू नका पगारवाढी संदर्भातील बोलणी सुरू होतील, तेव्हा पगार वाढवण्यासंदर्भात बोलावे, सदाभाऊ खोत आंदोलन भरकटवू नका. त्या माझ्या भगिनी आहेत. त्यांनीही विचार करावा की त्यांचे यात नुकसान आहे, असंही परब म्हणाले.मुख्यमंत्र्यांवर मुख्य प्रश्नापासून लक्ष्य टाळण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करताय, पण ते सिद्ध करा आंदोलन वेगळ्या दिशेने नेले जातंय. त्यांनाही कळलंय की हे आंदोलन चुकीचे आहे. कामावर कामगार आले नाहीत तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, जे कामगार येतील त्यांना संरक्षण देवू, असा इशाराही परब यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार-राज्यपाल वाद पुन्हा नव्या विषयावरुन पेटला, राज्यपालांना सरकारी विमान नाकारलं

News Desk

वैद्यकीय गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलीस विभाग स्थापनचा विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

News Desk

पंतप्रधान मोदींना अनेकवेळा हरवणारा नेता शरद पवारांच्या भेटीला!

News Desk