HW News Marathi
Covid-19

एकही केस लपवायची नाही, उद्या डेथ रेट वाढला तर बाहेर बिंग फुटणार | उद्धव ठाकरे

मुंबई | “मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे, एकही केस लपवायची नाही. कारण आपल्याला यातून बाहेर पडायचे आहे. लपवून काय होणार आहे? उद्या डेथ रेट वाढला तर बाहेर बिंग फुटणार आहे. मला यात पाप नाही करायचे. जे खरे आहे ते खरे आहे. आपण सत्याला सामोरे जाऊ, जे आहे ते लोकांसमोर ठेऊ,” अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे

राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील सरकारकडून कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीबाबत लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे की एकही केस लपवायची नाही, कारण आपल्याला यातून बाहेर पडायचे आहे. लपवून काय होणार आहे? उद्या डेथ रेट वाढला तर बाहेर बिंग फुटणार आहे, मला यात पाप नाही करायचे. जे खरे आहे ते खरे आहे. आपण सत्याला सामोरे जाऊ, जे आहे ते लोकांसमोर ठेऊ! लोकांना मदतीची किंवा सहकार्याची विनंती करू, कारण हे त्यांच्यासाठीच चाललेले आहे. आणि त्यांनी सहकार्य केलं तर मला खात्री आहे की आपण यशस्वी ठरू. मी पहिलेच बोललोय की तुम्ही खबदरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. मी आतापर्यंत जबाबदारी घेतलेली आहे,’’

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

News Desk

विधानपरिषद रिक्त जागेबाबत राज्यपालांना केलेल्या विनंतीचा पुनरुच्चार

News Desk