HW News Marathi
महाराष्ट्र

‘मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल’,नाना पटोलेंचा मिश्किल टोला!

नागपूर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू असो वा मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच असल्याचं विधान केलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल, संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं, अस पटोले म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?

मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात हिंदू असो वा मुस्लिम असो सर्वांचं डीएनए एकच असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्वानांनी कट्टरपंथीयांविरोधात उभं राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. तसेच ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावली. मुस्लिम कट्टरपंथीय असल्याचं हिंदूंना सांगून ब्रिटिशांनी भांडणं लावली. त्यातच दोन्ही समाजात एकमेकांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी कधीच एकमेकांसमोर आपलं म्हणणं मांडलं नाही. म्हणून दोन्ही समाजात अंतर निर्माण झालं. आता आपण आपला दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं ते म्हणाले.

निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नका

कोरोनाबाबत केंद्र सरकार निर्णय घेतं. त्याचं पालन राज्य सरकार करतं. भाजप राज्य सरकारला बदनाम करत आहे. भाजपला आंदोलनच करायचं असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात करावं. कारण मोदी सरकारनेच कोरोनाच्या गाईडलाईन आणि सूचना दिल्या आहेत, असा हल्ला त्यांनी भाजपवर चढवला.दरम्यान, पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नका, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली. मागासवर्गीय आयोगाने मागितलेले 450 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जीएसटी’ दोषविरहीत करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन

News Desk

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

News Desk

आमच्या नेत्याचं शिक्षण काढू नका, आमच्या वाटेला जाऊ नका, राणे समर्थकांचा विनायक राऊत यांना इशारा

News Desk