HW News Marathi
Covid-19

पुणेकरांना दिलासा …पुण्यातला विकेंड लॅाकडाऊन अखेर रद्द !

पुणे | पुणे जिल्ह्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याने पुणे जिल्ह्यात विकेंड लॅाकडाउन अखेर रद्द करण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे. टोपे यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

राजेश टोपे म्हणाले “पुण्यात संख्या कमी होते आहे. पण पॅाझिटिव्हिटी कमी होत नाहीये.लॅाकडाउनला पंधरा दिवसाचे एक्सटेन्सन मिळु शकते .त्यासाठीची नियमावली साधारण ३१ तारखेला किंवा १ तारखेला जाहीर करणार आहे. पुण्यातल्या महापौरांनी काही सुचना केल्या आहेत. त्याचा विचार करु. मात्र नेत्यांच्या सुचनेनुसार शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवांबाबतचा लॅाकडाउन रद्द करण्यात आलेला आहे. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. त्या ७ ते ११ मध्येच सुरु रहातील”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजयादशमीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करू, धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा !

News Desk

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा

News Desk

सोनु सूदवरून महाविकासआघाडीतले मतभेद उघड !

News Desk