नवी दिल्ली | सद्यस्थिती एकीकडे देशभरातील सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांची घरवापसी सुरु असताना पश्चिम बंगाल सरकारकडून मात्र स्थानिक मजूरांच्या घरवापसीसाठी परवानगी देण्यात नसल्याचे समोर आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्र यांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या नागरिकांना राज्यात परत आणण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचे सोमेन यांनी म्हटले आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना याबाबत पत्रही लिहिले आहे. “मी राज्यात येऊ इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांच्या रेल्वेभाड्याचा खर्च करण्यास तयार आहेत. तुम्ही केवळ सहकार्य करावे. याविषयी गांभीर्याने विचार करून अन्य राज्यांत अडकलेल्या आपल्या राज्यातील मजूरांना परत येण्याची परवानगी द्यावी”, अशी मागणी सोमेन यांनी पत्राद्वारे ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.
Dear CM @MamataOfficial,its unfortunate ur govt is reluctant to cooperate with us in bringing laborers back.Plz become serious & grant necessary permission for it.
I will pay the train fares of all migrants laborers & I only expect ur cooperation.
This isn't the time for politics pic.twitter.com/yRM695QQjC— Somen Mitra Foundation (@SomenMitraINC) May 15, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर आपल्या घरापासून, गावापासून लांब शहरांमध्ये अडकून पडले. या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांची अवस्था बिकट झाली. वारंवार आपल्याला स्वगृही परतण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत होती. त्यानंतर, अखेर केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना, विद्यार्थ्यांना, यात्रेकरूंना आपल्या स्वगृही जाण्यास परवानगी दिली. तब्बल ४१ दिवसांनंतर या मजुरांना, अडकलेल्या अन्य लोकांना आपल्या घरी जाण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली. केंद्राकडून श्रमिक ट्रेन, स्पेशल पॅसेंजर ट्रेनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र, पश्चिम बंगाल सरकारकडून आपल्याच नागरिकांना राज्यात घेण्यास तयारी दाखवली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.