नवी दिल्ली | “१७ मेनंतर काय ? आणि १७ मेनंतर कसे ? लॉकडाऊन किती काळासाठी ठेवायचा याबाबत भारत सरकारचे निकष कोणते आहेत ?”, असे प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (६ मे) उपस्थित केले आहेत. काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यासह खासदार राहुल गांधी हे देखील उपस्थित होते. या बैठकीत स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नासंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी देखील सोनिया गांधी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.
After May 17th, what? and after May 17th, how? What criteria is Govt of India using to judge how long the lockdown is to continue: Congress interim President Sonia Gandhi during Congress Chief Ministers' meeting. #COVID19 pic.twitter.com/B7gDV9X2lB
— ANI (@ANI) May 6, 2020
देशात छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, पुदुच्चेरी या ४ राज्यांसह महाराष्ट्रात कॉंग्रेससह शिवसेना राष्ट्रवादीचे महाविकासआघाडीचे सरकार आहे. या काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज सोनिया गांधी यांनी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या राज्यांकडून कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्याचप्रमाणे स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. सध्या स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवास खर्चाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. काहीच दिवसांपूर्वी, या स्थलांतरित मजुरांचा रेल्वे प्रवास खर्च काँग्रेस पक्ष करेल, असे देखील सोनिया गांधी यांनी जाहीर केले होते. त्यानंतर या मजुरांचा रेल्वे तिकिटाचा ८५% खर्च केंद्राकडून केला जाईल, असे जाहीर करण्यात आले मात्र अद्यापही याबाबत संभ्रम आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.