जळगाव | राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासुन सुरुवात होईल आणि निकाल २६ मार्चला जाहीर होणार आहे. एकिकडे महाविकासआघाडीमध्ये चौथ्या जागेसाठी संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे भाजपकडून उदयनराजे भोसले, माजी मंत्री एकनाथ खडसे, तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नसून, ते राज्यसभेऐवजी विधान परिषदेवर जाण्यासाठी आग्रही असल्याचे म्हटले जात आहे. येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेसाठी भाजपातर्फे एकनाथ खडसे, रामदास आठवले, तसेच उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज शनिवारी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत एकनाथ खडसे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी केवळ दोनच शब्द उच्चारले.
राज्यसभेबाबत त्यांना विचारले असता, नो कमेंट्स अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यसभेवर जायला खडसे इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.