HW News Marathi
महाराष्ट्र

‘राज’ यांच्याकडून काय शिकलात ?, आदित्य म्हणाले….

अहमदनगर | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १८ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील लोकांशी संवाद साधून, त्यांचे आभार मानत आहेत. आज (२२ जुलै) त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पाचवा दिवस असून ते अहमदनगरमध्ये होते. यावेळी आदित्य यांनी नगरमधील युवकांशी संवाद साधला. यावेळी एका युवकाने विचारलेल्या एका प्रश्नाच्या आदित्य यांनी दिलेल्या उत्तराची प्रचंड चर्चा होत आहे.

“तुम्ही तुमचे काका राज ठाकरे यांच्याकडून राजकारणाबद्दल काय शिकलात ?”, असा प्रश्न एका युवकाने आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, “राजकारणात खरंतर कोणीच कोणाला शिकवत नाही. राजकारणात आपण जे काही शिकतो ते लोकांकडून शिकत असतो. आणि मी जे काही धडे घेतले ते माझे आजोबा व माझ्या वडिलांकडूनच घेतले आहेत”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“एकदा आपण एखादं काम करण्याचा निर्णय घेतला कि मग त्यापासून मागे फिरायचे नाही”, हे मी माझ्या आजोबांकडून शिकलो. तर, “जे कराल ते प्रामाणिकपणे करा. खोटे बोलू, नाटके करून काही करू नका”, हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो. बाकी धडे मी लोकांकडून शिकतो आहे”, असे सूचक विधान करत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोहम्मद पैगंबरांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश सर्वांनी आचरणात आणून मानवतेच्या कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाऊया 

News Desk

वाहनांवरील लाल व अंबर दिवे तात्काळ काढून टाका –  आरटीओ नांदेड 

News Desk

राज्यात थंडीचा जोर वाढला, मुंबईत १२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

swarit