HW News Marathi
महाराष्ट्र

“मी नगरसेवक झाल्यानंतर बाबरी पाडायला गेलो “, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर

मुंबई। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा पार पडली. या सभेत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विविध मुद्यावरून हल्लाबोल केला आहे. “मी १९९२ साली फेब्रुवारीमध्ये नगरसेवक झाला. मी जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक झाल्यानंतर बाबरी पाडायला गेलो होतो, ” असे सडेतोड उत्तर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

फडणवीस म्हणाले, “मी १९९२ साली फेब्रुवारीमध्ये नगरसेवक झाला. मी जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक झाल्यानंतर बाबरी पाडायला गेलो होतो. आम्ही काय सहलीला चला असे नाय, आम्ही लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, असे सांगत अयोध्याला गेला होता. तुम्ही सहलीला गेले होते, आम्ही सहलीला गलो नव्हतो,” त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले

“बाबरीच्या वेळी एकही शिवसेनेचा एकही कार्यकर्ते नव्हते. मी गेले होतो, असे ते म्हणतात. तुमचे वय काय होते?, तेव्हाच्या शाळे सहल गेली होती का?, तुमचे वय काय, तुम्ही बोलता किती. तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले हे जरा जनतेला कळून जाऊ द्या. हिंदुत्वासाठी तुम्ही काय केले. तुम्ही नुसते बाबरीवर चढणचा प्रयत्न जरी केला असता, तरी बाबरी खाली आली असती. लोकांना बाबरी पाडण्यासाठी श्रम करायला लागले नसते. तुम्ही एक पाय टाकला असता तरी बाबरी खाली असती,” अशी टीका मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांच्या नागपूरातील घरानंतर मुंबईतील घरावरही ED चा छापा

News Desk

“दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची उर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली”, राजू शेट्टींचा टोला 

News Desk

‘तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहितीय’, क्रांतीने शेअर केली खास पोस्ट

News Desk