HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री धनंजय मुंडे CSMT स्थानकावर हमाल मंडळींशी गप्पा मारण्यात रमतात तेव्हा…!

मुंबई । राज्याच्या विरोधीपक्षनेते पदी असताना मुंबई येथील CSMT रेल्वे स्थानकावर ज्या पेटीवर (हमालांचे बसण्याचे एक ठराविक ठिकाण) ९० च्या दशकात भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे बसत असत त्याच पेटीवर प्रवासासाठी निघालेल्या धनंजय मुंडे यांना स्थानकावरील हमाल मंडळीनी बसण्याचा आग्रह केला असता धनंजय मुंडे त्याच पेटीवर बसून येथील हमाल मंडळींशी मनमोकळ्या गप्पा केल्या.

धनंजय मुंडे यांनी CSMT स्थानकावरील जवळपास सर्वच हमाल मंडळींना व अन्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, सर्वांना आपल्या शासकीय निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले. झाले असे की, गुरुवारी (१९ नोव्हेंबर) धनंजय मुंडे हे लातूर-बीड जिल्हा दौऱ्यासाठी CSMT रेल्वे स्थानाकावरुन मुंबई – लातूर एक्सप्रेस रेल्वेने प्रवासासाठी निघाले होते. रेल्वेच्या निघायच्या काही मिनीटे आधी ते सीएसटी स्थानकावर आले असता, येथील हमाल मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना गोपीनाथराव मुंडे विरोधीपक्षनेते पदी असताना वेटिंग रूममधील ज्या पेटी वर बसायचे त्याच पेटीवर बसण्याचा आग्रह केला.

धनंजय मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पेटीवर बसून सर्व हमाल मंडळींशी संवाद साधत त्यांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांना त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, शरद पवारांनी केलं सेनेचं कौतुक

News Desk

आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती मात्र शिवसेनेतील २ नेत्यांची याबाबत नाराजी

News Desk

‘त्यात चुकीचं काय केलं’, अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याच संजय राऊतांकडून समर्थन…!

News Desk