HW News Marathi
महाराष्ट्र

कुठे जन्मले दुतोंडी बालक

बीड – अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी रात्री दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म झाला. या विभागातील प्रख्यात सर्जन व सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली असून बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. बाळाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी त्याला शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

परळी तालुक्यातील एक महिलेला ही मुले झाली आहेत. डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेचे सीझर केले व बाळाचा जन्म झाला. दरम्यान जन्माला आलेल्या बाळाला दोन तोंडे होते. या बाळाचे वजन ३ किलो ७०० ग्रॅम असून बाळ आणि बाळाच्या आईची प्रकृती सध्या चांगली आहे. सध्या बाळावर शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

” सामान्यांचा श्वास गुदमरतोय, त्याची पर्वा कोणाला आहे का?”, सामना अग्रलेखातून केंद्रावर हल्ला

News Desk

…म्हणून सोलापूरात विरोधकांच्या संघर्ष यात्रेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

News Desk

‘शिवाजीचे उदात्तीकरण’ पुस्तकावर भाजपच्या मागणीनंतर बंदी येणार ?

swarit