HW News Marathi
महाराष्ट्र

जिथे पाऊस नाही, तिथे निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश

नवी दिल्ली | “जिथे पाऊस नाही, तिथे निवडणुका घ्या. आणि जिथे पाऊस आहे, तिथे मान्सूननंतर निवडणुका घ्या,” असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहे. कोकण आणि मुंबईत पावसाळ्यानंतर निवडणुका घ्या. तर मराठवाडा आणि विदर्भात निवडणुका घ्या, असे आदेश न्यायालयाने आज (१७ मे) पार पडल्या सुनावणीत म्हटले आहे.  

राज्यात जिथे पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास का हरकत आहे?, असा सवाल न्यायालयाने आयोगाला केला. यामुळे आयोगाने जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तिथे निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. त्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात कमी पाऊस पडतो. त्यामुळे तिथे निवडणुका होऊ शकतात. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता जुलै महिन्यात होणार आहे. यामुळे आता आयोग निवडणुकीचा कार्यक्रम कसा तयार करेल, याकडे सर्व राज्याचे लक्ष लागेल आहे.       

Related posts

अंत्योदयाची संकल्पना सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रतोदचा विशेषांक महत्त्वपुर्ण -अर्थमंत्री मुनगंटीवार

News Desk

जळगावात २९ वीजचोरांवर कारवाई

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची तयारी

Aprna