HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी?, राज्यातील नेते जाणार सोनिया गांधींच्या दरबारी

मुंबई | “महाविकास आघाडी सरकारला अडीज वर्ष पूर्ण झाले आहेत. आमच्या नेत्या सोनिया गांधी जो कॉमन मिनिमम प्रोग्रामची अंमलबजावणी झाली की नाही, या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवली आहे,” अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. पटोलेंनी आज (३० मे) राज्यसभेसाठी काँग्रेसने दिलेल्या काँग्रेस नेता इम्रान प्रतापगढी उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या पत्रकारांनी विचारल्या पटोले म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारला अडीज वर्ष पूर्ण झाले आहेत. आमच्या नेत्या सोनिया गांधी जो कॉमन मिनिमम प्रोग्राम दिलेला होता. त्याची अंमलबजावणी व्हावी. ही झाली की नाही या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. यामुळे राज्यातील प्रमुख नेते बैठकीला जाणार आहोत, अशी त्यांनी दिली आहे.

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी स्थानिक उमेदवार न देता, इमरान प्रतागडी यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षा अंतर्गत नाराजी असल्याच्या प्रश्नावर पटोले म्हणाले, “नरेंद्र मोदी हे गुजरातचे असून उत्तर प्रदेशातील वाराणसीतून निवडणुक लढवली ना. हा प्रश्न तेव्हा विचारला गेला नव्हता. खरे पाहायला गेले तर राज्यसभा आणि लोकसभा यांचे नेतृत्व देशाचा नागरिक असलेला व्यक्त करतो. आणि हे सर्व आमच्या पक्षाचे नेते आहे. सोनिया गांधींनी घेतलेला निर्णय आहे. आणि ही योग्य उमेदवारांची करून आमच्या एका तरुण मित्राला राज्यसभेत पाठवले. आमच्या हाय कंमाड राज्यसभेवर पाठवून मोठे काम आणि चांगले केले आहे. महाराष्ट्र काँग्रेस हाय कंमाड यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.”

Related posts

वटहुकूम आणि घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी, संभाजीराजेंची मागणी

News Desk

विकासकामे करून दाखवणारे सरकार! – उद्धव ठाकरे

Aprna

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या!

News Desk