HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात वाढदिवसाचं बेकायदा होर्डिंग लावल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार चांगलेच भडकले!

पुणे। वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा फलक लावू नये, असा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला होता मात्र, या आदेशाला झुगारून पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावले आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलक, बॅनर लावण्यात येऊ नयेत. बॅनर, जाहिराती केल्याचे दिसल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे भाजपाकडून एका निवेदनाद्वारे स्पष्ट सांगण्यात आलं होत. तर वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधी कोरोना नियंत्रणासाठी द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मात्र तरीही शहरात बॅनरबाजी करण्यात आली यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर पुणे शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री चांगलेच संतापले आहेत.

अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. त्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीचं वर्ष लक्षात घेता, भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासपुरुष’ म्हणून होर्डिंग लावले गेले; या होर्डिंग्जला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिलं आहे. या पोस्टर वॉरची शहरभर चर्चा रंगली आहे. त्यावर उत्तर देताना अजित पवार चांगलेच भडकले.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हे आदेश दिल्यानंतरही शहरात जागोजागी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच नेत्यांचे आदेश धुडकाविल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रमुख चौकात, रस्त्यांवर फलक उभारून आपापल्या नेत्यांनी शहराचा विकास केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. कार्यकर्त्यांनी उभारलेल्या या शुभेच्छा फलकांवर महापालिकेकडून कारवाई होणार का, असा हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

  • काय आहे प्रकरण?

पुणे शहरात मागील तीन चार दिवसांपासून भाजपाकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरभर विकासपुरुष या मथळ्याखाली फ्लेक्स लावले जात आहेत. या फ्लेक्सबाजीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाला सुनावलं. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना तोंडही फुटलं. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून २२ जुलै रोजी अजित पवार यांचा देखील वाढदिवस असल्याने भाजपाच्या फ्लेक्सबाजीला ‘कारभारी लयभारी’ने उत्तर देण्यात आले आहे.

त्यामुळे गेले दोन दिवस शहरात लावण्यात आलेल्या या होर्डिंगमुळे राजकीय वर्तुळात अत्यंत खमंग चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते हे देवेंद्र फडणवीस कधीपासून पुण्याचे विकासाचे शिल्पकार झाले असा प्रश्न विचारत आहेत तर भाजपकडून शहरातले मेट्रो पासून जायका पर्यंतचे सगळे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून आले असल्याचा दावा करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्ट उभारण्यासाठी हालचालींना वेग; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली बैठक

Aprna

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीनंतरच मेगा भरती

News Desk

“अजितदादा पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी भाजपची कोण-कोण लोकं होती?”, सामनातून सेनेचा सवाल

News Desk