HW News Marathi
महाराष्ट्र

कीर्तनकार बंडातात्या कराडकरांनी वाईन धोरणाविरोधात बोलताना ‘या’ महिला नेत्यांवर केले आक्षेपार्ह वक्तव्य

मुंबई | सुपर मार्केट आणि ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस महाविकासआघाडी सरकारने दिलेल्या परवानगीविरोध करताना ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे महिला नेत्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले. कराडकरांनी महिला नेत्यांवर केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. “सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, ” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी राज्यातील सर्व स्तरातून कराडकरांवर टीका होत आहे. 

“ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला,” अशी म्हण म्हणत कराडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. नुकतेच  सुपर मार्केट आणि ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस महाविकासआघाडी सरकारने परवानगी दिल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन केले आहे. यावेळी भाषण देताना कराडकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले. 

कराडकर म्हणाले, “राज्य सरकारच्या डोळ्यावरील धुंदी उतरण्यासाठी वारकरी संप्रदाय आंदोलन करत आहेत, याची राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी. वाईन विक्रीचा निर्णय हा अजित पवार यांचे आहे. म्हणजे अजित पवार ढवळा असून त्यांच्यासोबत कामकरणारे जोडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पवळ्या आहेत. म्हणजे निर्णय अजित पवारांनी घ्याचा आणि तो मुख्यमंत्र्यांनी राबवायचा, हेच महाविकाआघाडीचे धोरण आहे.”

राज्यातील नेत्यांची मुले दारुच्या आहारी गेले असून कराडकरांनी काही जणांची नावे दिली. यावेळी कराडकरांनी पतंगराव कदम यांच्या मुलांचे निधन कसे झाले होते हे विचारा?, आणि सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंच्या नावाचा उल्लेख त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पुढे म्हणाले, राज्यातील कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही, त्यांचे नाव सांगा, असे आव्हानच त्यांनी पत्रकारांना केले. मी ज्या राजकारणांची नावे घेतली आहेत, त्यांची पुरावे माझ्याकडे मागितले त मी ते सिद्ध करु शकतो, असे ते म्हणाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरातील ‘तो’ पॉझिटिव्ह रुग्ण मरकजमध्ये झाला होता सहभागी

News Desk

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता आरक्षण द्यावे

swarit

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन

News Desk