HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई वाहतूक पोलिसांची अनोखी मोहीम: ‘वेदनादायक परिणाम’ या घटनांसह रस्ते अपघात कमी करण्याचा प्रयत्न

मुंबई | आजकाल तुम्ही शहरातील रस्त्यांवर फिरताना विद्याच्या घटनांचे होर्डिंग्स पाहिले असतील. हे पाहून तुम्हाला वाटले असेल की, असे होर्डिंग का लावले आहेत? मुंबई वाहतूक पोलिसांनी वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अनोखी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे की, वाहतुकीचे नियम न पाळणे खूप जड जाते. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अशा लोकांची गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जे स्वतःच्या चुकीमुळे आणि इतरांच्या निष्काळजीपणामुळे मरण पावले आहेत. विद्याची कथाही अशीच आहे. विद्या अवघ्या २७ वर्षांची होती. जेव्हा तिचा मुंबईत एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने विद्याला धडक दिली.

 

 

 

 

विद्याचा मृत्यू हा इतरांच्या निष्काळजीपणाचा परिणाम होता. मात्र, मुंबई वाहतूक पोलिसांनी या मोहिमेत त्यांच्या निष्काळजीपणामुळे मृतांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही नमूद केल्या आहेत. अशीच एक गोष्ट अनिलची आहे, ज्यांनी हेल्मेट न घालता गाडी चालवत होता आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी अनिलने हेल्मेट घातले असते तर कदाचित अनिलचा जीव वाचला असता. त्याचवेळी चुकीच्या दिशेने येणाऱ्या एसयूव्ही चालकाने इरफान आणि त्याच्या 5 महिन्यांच्या मुलाचा जीव घेतला. मुंबईतील वरळी सी-लिंक, माहीम जंक्शन, भायकाळा फ्लायओव्हर, मराठा मंदिर, ईस्टर्न फ्री वे, पेडर रोड अशा प्रमुख ठिकाणी हे होर्डिंग पाहायला मिळते. याशिवाय वाहतूक पोलिसांची ही मोहीम बसस्थानकावरही पाहायला मिळणार आहे.

 

 

 

 

मोहीम म्हणजे काय?

मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील सुमारे ६० ठिकाणी असे पोस्टर्स लावले असून, त्यात वाहन चालवताना स्वतःचा आणि इतरांचा निष्काळजीपणा किती जीवघेणा ठरू शकतो, हे सांगण्यात आले आहे. मुंबईचे जॉइंट सीपी ट्रॅफिक राजवर्धन यांनी या मोहिमेमागील विचार काय आहे हे सांगितले. राज्यवर्धन म्हणाले, “मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांबाबत मुंबईतील लोकांच्या वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी राबवलेली ही सुरक्षा जनजागृती मोहीम आहे. दुर्लक्षामुळे लोकांच्या जीवनावर कसा परिणाम झाला. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की, वाहतूक नियमांचे पालन करावे.”

रस्ते अपघातात वाढ

वाढते रस्ते अपघात लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी ही मोहीम सुरू केली आहे. आकडेवारीनुसार, २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये रस्ते अपघातात सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, २०२१ च्या पहिल्या ६ महिन्यांत रस्ते अपघातातील मृतांच्या संख्येत २२ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत मुंबईत १४,२४५ रस्ते अपघातांची नोंद झाल्याचे आकडेवारी सांगते. ज्यामध्ये सुमारे 6,७०८ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०,८७९ लोक जखमी झाले. दारूच्या नशेत वाहन चालवणे ही देखील चिंतेची बाब आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे सुमारे ६१ लोकांचा मृत्यू झाला तर २०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात आणखीनच वाढ!

News Desk

देशमुख तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचं हार टाकून स्वागत करायचं का? भाजपची टीका!

News Desk

भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग, तर महापौर म्हणतात….!

News Desk