HW News Marathi
महाराष्ट्र

परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण? भाजपचा सवाल!

सोलापूर। तुटपुंजा पगार आणि तोही वेळेत होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यातच महामंडळाला आवश्यक नसलेल्या गोष्टींसाठी टेंडर काढली जात आहेत. हे कुणाच्या टक्केवारीसाठी चाललं आहे? असा सवाल करतानाच परिवहन मंत्र्यांच्या महामंडळाताली सचिन वाझे कोण?, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने प्रवास करतो. पण आपल्या त्यागानं व सेवेने एसटी महामंडळला मोठं करणाऱ्या

मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी ही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे.

पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत

एकतर तुटपुंजा पगार. त्याचाही वेळेवर पत्ता नाही… ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्टींसाठी हजारो कोटींचे टेंडर काढ़ून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जाते. पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत. हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय..? परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातला सचिन वाझे कोण?, असा सवाल करतानाच या सर्वांविरोधात ज्या युनियने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या

पण माझं सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की, आपण कुठल्याही दबावाला न झुकता आपल्या हक्कासाठी लढा उभारा. मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे. माझं राज्य सरकारकडे मागणं आहे की, ‘जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या ‘ अन्यथा अन्यथा संघर्ष अटळ आहे. या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या 21 सप्टेंबरला झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण तिथे मोठ्या संख्येनं यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आणि ओबीसी समाजात सरकारला भांडणं लावायची आहेत, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

News Desk

कस्तुरबा रुग्णालयात मुंबईतील ६ ‘कोरोना’ संशयित दाखल

swarit

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा मराठवाडा अतिवृष्टी पाहणी दौरा!

News Desk