HW News Marathi
Covid-19

‘संथ लसीकरणामुळे डेल्टा विषाणूचा धोका कायम’

नवी दिल्ली। कोरोना रुग्णाने गेला दीड वर्ष देशात थैमान घातलं आहे. या रोगाची तिसरी लाट येणार अशी आशंका दर्शवली जात असताना, डेल्टा प्लस हा विषाणू आता देशात थैमान घालताना दिसत आहे. डेल्टा विषाणूचा प्रसार तसेच अनेक देशांत धीम्या गतीने होत असलेले लसीकरण, लोकांचे खबरदारी न घेताच आपसात मिसळणे वाढल्याने कोरोना साथीचा धोका पूर्वीइतकाच कायम आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. आफ्रिकेमध्ये गेल्या दोन आठवड्यांत कोरोनामुळे मृत्यूदर ३० ते ४० टक्क्यांनी वाढला असल्याचे त्यांनी सांंगितले आहे .

नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही

या रोगाविषयी अजून माहिती देताना त्या म्हणाल्या,’ जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाचे सहा विभाग कल्पिले आहेत. त्यापैकी पाच विभागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत जगभरात पाच लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून ९३०० जण मरण पावले आहेत. हे पाहता या साथीचा वेग मंदावला आहे असे म्हणता येणार नाही. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, लोक अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. ते नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत. तसेच विविध ठिकाणी प्रतिबंधक नियम शिथील करण्यात आले आहेत. कोरोनाच्या मूळ विषाणूमुळे बाधित झालेली व्यक्ती तीन जणांना बाधित करू शकत असे. पण डेल्टा विषाणूग्रस्त व्यक्ती आठ जणांना संसर्ग देऊ शकते. त्यांनी सांगितले की, काही देशांनी केवळ प्रतिबंधक नियम शिथील केले नाहीत तर मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यावरील बंधनेही सैल केली’.

कोवॅक्सिन बद्दल त्या काय म्हणाल्या?

कोवॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष आश्वासक आहेत. या लसीला जागतिक आरोग्य संघटना ॲागस्ट महिन्याच्या मध्याला किंवा अखेरीस मान्यता देण्याची शक्यता आहे असेही त्या संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या. कोरोना विषाणू्च्या विविध प्रकारांवर कोवॅक्सिन लस परिणामकारक ठरते का, याचे प्रयोग करण्यात आले. डेल्टा विषाणूविरोधात कोवॅक्सिनची परिणामकारकता कमी आहे असेही निरीक्षण स्वामीनाथन यांनी नोंदविले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२ हजार ऊसतोड मजूर बीड जिल्हयात परतले, चेक पोस्टवर वैद्यकीय तपासणी करूनच जिल्हयात प्रवेश

News Desk

“निलेश राणे लवकर बरे व्हा”, रोहित पवारांनी दिल्या सदिच्छा

swarit

आईच्या निधनानंतर ३ दिवसातच राजेश टोपे पुन्हा राज्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले

News Desk