HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोण असेल आपचा सीएम उमेदवार?’ गुजरात विधानसभा निवडणुकींसाठी ‘आप’ची नवीन मोहीम

मुंबई | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने ‘कोण असेल आपचा सीएम पदाचा उमेदवार’? या मोहिमेला सुरुवात केली आहे. स्वतः केजरीवाल यांनी या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला आहे. देशात हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यात येत्या काही दिवसांत निवडणुका पार पडणार आहे. गुजरात विधासभेच्या 182 जागांवर निवडणुका होणार आहेत. पण, निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाही. तरी देखील आप भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला काबीज करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी पत्रकार परिषद घेऊन ‘कोण असेल आपचा सीएम उमेदवार?’  या मोहिमेचे उद्घाटन केले.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉन, बालक ड्रग पार्क, टाटा एअर बस हे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी देखील या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये एक बैठक बोलावली होती. तर याचा फायदा आम आदमी पक्षाला किती होणार हे येत्या दिवसात निवडणुकीत कळेल.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल ?

पत्रकार परिषेदेत केजरीवाल म्हणाले, आपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार हाच गुजरातचा नवीन मुख्यमंत्री असेल. आज आम्ही जनतेला विचारू इच्छितो की, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण होईल, याबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी एक नंबर जारी केला आहे. त्याचबरोबर एसएमएस किंवा व्हाट्सअप मेसेज देखील पाठवू शकता. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालांनी शनिवारी पक्षाचा गुजरातच्या सुरत येथे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी मोहीम सुरू केली. पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी ही घोषणा केली. “गुजरातमध्ये असे वातावरण आहे की आम आदमी पार्टीचे सरकार येणार आहे. आम्हाला गुजरातच्या जनतेला पुढील मुख्यमंत्री कोण असावे हे विचारायचे आहे आणि त्यासाठी आम्ही संपर्क क्रमांक आणि ईमेल-आयडी जारी करत आहोत. लोक सूचना पाठवू शकतात,” केजरीवाल म्हणाले, की लोकांनी एसएमएस, व्हॉट्सअप किंवा व्हॉइस मेसेजद्वारे त्यांच्या सूचना पाठवू शकतात. लोकांसाठी ईमेलद्वारे देखील पाठवू शकतात. हेल्पलाइन 3 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील आणि 4 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल”, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “आपमध्ये, आम्ही असे करत नाही. आम्ही जनतेला विचारून ठरवतो की तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवे. तुम्हाला आठवत असेल की पंजाबमध्ये आम्ही लोकांना मुख्यमंत्री कोण व्हावे हे विचारले होते. आणि त्यानुसार. लोकांच्या इच्छेनुसार आम्ही भगवंत मान यांचे नाव दिले,” असे केजरीवाल म्हणले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सांगितला आर्थर रोड कारागृहाचा अनुभव

News Desk

“मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता पण आता…”, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk

दारूच्या दुकानाविरोधात नगरसेवकांनी केला अंगावर राकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk