HW News Marathi
महाराष्ट्र

‘आम्ही तुमचे बाप आहोत’ चंद्रकांत पाटील अजित पवारांना असे का म्हणाले ?

पुणे | पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी पुण्याला वेळ द्यावा असा सल्ला काही दिवसांपूर्वीचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.अजित पवार पालकमंत्री असले तरी महानगरपालिकेत सत्ता मात्र भाजपची आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महानगरपालिका काबीज करण्याचा प्रयत्न अजित पवारांचा नक्कीच असणार आहे,त्यावरून आता चंद्रकांत पाटलांनी पवारांना टार्गेट केले आहे. ‘पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. आज पुण्यातील कोथरूड येथे भाजपच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, यावेळी पाटील बोलत होते.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पुणे महानगरपालिकेत काल झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्नं पडत आहेत, त्यांनी जास्त ऊर्जा वायाला घालवू नये आम्ही देखील अजित पवार यांचे बाप आहोत,”त्यामुळे आता महानगरपालिकेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर उद्धव ठाकरेही बेईमान झाले नसते”, शिवसेना नेत्याचं फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

सरकारमध्ये रंग बदलण्याचं धाडस आहे! – उद्धव ठाकरे

News Desk

साताऱ्यात ऐतिहासिक भवानी तलवारीची मिरवणूक

News Desk