HW News Marathi
महाराष्ट्र

“देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजप सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का?”

मुंबई | ‘सरदार उधम’ चित्रपटात ब्रिटिशांबद्दल द्वेष दाखवण्यात आला असल्याचं कारण देत ज्युरींनी हा चित्रपट ऑस्कर नामांकनातून वगळणं हा १३० कोटी भारतीयांचा अपमान आहे. सरदार उधमसिंह हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या जाज्वल्य इतिसाहातील एक सोनेरी अध्याय आहे. ब्रिटींशांबद्दलचा कळवळा दाखवून उधमसिंह यांच्या देशप्रेमाचा, त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा हा अपमानच आहे. देशप्रेमाचे सतत उमाळे येणारे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार या विषयावर गप्प का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, ‘सरदार उधम’ चित्रपट हा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी वगळणं हे फक्त चित्रपटापुरतं मर्यादित नसून तो समस्त भारतीय जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा चित्रपट जालियनवाला बाग घटनेवर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका निधड्या छातीच्या नायकावर हा चित्रपट बनवलेला आहे. चित्रपटाची निमिर्तीमुल्ये, दर्जा यात तो कुठे कमी पडल्याचं कारण नाही फक्त इंग्रजांबद्दलचा द्वेष हे ज्युरींचं कारण अत्यंत हास्यास्पद आहे.

जालीयनवाला बागेत जनरल डायरने शेकडो निरपराध व निष्पाप लोकांवर गोळ्या घालून नरसंहार केला. हा नरसंहार भारतीयांच्या मनातील भळभळती जखम आहे. हे घडवून आणणाऱ्या जनरल डायरला गोळ्या घालून उधमसिंह यांनी या घटनेचा बदला घेतला. भारताच्या स्वातंत्र्यांसाठी लढताना ब्रिटिश सत्तेने अनन्वीत छळ केले. जालीयनवाला बाग हे त्याचेच एक उदाहरण आहे. स्वातंत्र्यासाठी हसत हसत सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांपैकी सरदार उधमसिंह हे एक आहेत. या चित्रटातून देशाभिमान जागृत होत असताना आजही ब्रिटिशांच्या अपमानचं कारण पुढे केलं जात असेल तर ते अत्यंत निषेधार्ह आहे, असं अतुल लोंढे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांकडून इंदिरा गांधींबाबतचे ‘ते’ विधान मागे

News Desk

विरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात !

News Desk

डिझेल परताव्याचे १२ कोटी वितरित करण्यास वित्त विभागाची मान्यता! – अस्लम शेख

Aprna