पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रामध्ये गेली ६ वर्षे तुमचे सरकार आहे. ठीक आहे, आमच्याकडून चुका झाल्या. तर सहा वर्षांत त्या दुरुस्त करता आल्या नाहीत का, असा सवाल करीत पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
सध्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबतचं इंधन दरवाढीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.पेट्रोलने ठिकठिकाणी १०० री पार केली आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचे त्यावेळचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. मोदींच्या या आरोपांवर आता पवारांनी पलटवार केला आहे. पवार म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये सहा वर्षे सत्तेत असतानादेखील चुका दुरुस्त करता येत नसतील, तर त्यावर चर्चा काय करायची?केंद्रात गेली सहा वर्ष यांचे सरकार आहे. आमच्याकडून चुका झाल्या तर त्या सहा वर्षात दुरुस्त करता आल्या नाहीत का? असा सवाल पवारांनी केलाय.