HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्ही घरं सोडू नका, मी वरिष्ठांशी बोलतो”, राज ठाकरेंनी दिले पोलीसांच्या पत्नींना आश्वासन

मुंबई | मसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच पोलिसांच्या हितासाठी आग्रही राहिले आहेत. पोलिसांना हक्काची घर मिळाली पाहिजेत इथपासून ते त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याला मनसेने नेहमीच पाठिंबा दिला आहे. आता मुंबईत राहणाऱ्या काही पोलिसांवर राहती घर रिकामी करण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यामुळेच पोलिसांच्या पत्नींनी आज (१८ फेब्रुवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांच्या पत्नींना धीर देत वरिष्ठांशी बोलण्याचे आश्वासन दिले. राहती घर रिकामी करण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबियांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव आणला जातोय. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. “तुम्ही घरं सोडू नका, मी वरिष्ठांशी बोलतो” असे राज ठाकरेंनी पोलिसांच्या पत्नींना आश्वासन दिले आहे.

 

https://twitter.com/mnsadhikrut/status/1362353783796158464?s=19

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कसब्यात ‘मविआ’चे रवींद्र धंगेकर यांचा विजय; 28 वर्षानंतर ‘भाजप’चा पराभव

Aprna

“परळी सुन्न आहे! मान खाली गेली राज्याची”, करुणा शर्मा घटनेवर पंकजा मुंडेंचं ट्विट!

News Desk

९०० ई-बसेसमध्ये ३६०० कोटींचा घोटाळा; मिहीर कोटेजा यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

Aprna