मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. शिक्षण क्षेत्राला आणि विद्यार्थ्यांनाही या लॉकडाउनच फटका बसला. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या परीक्षा आणि नव्या शैक्षणिक वर्षाबाबत काळजीत असणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतः राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून कोणतीही चिंता न करण्याचे आवाहन केले आहे. परीक्षा, परीक्षांचे निकाल, नवे शैक्षणिक वर्ष याबाबत सध्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याने आदित्य ठाकरे यांनी आता ट्विट करून विद्यार्थ्यांना काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. येत्या २ दिवसांत राज्यातील शैक्षणिकक्षेत्रासंबंधीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.
To all the university students from Maharashtra worried and tweeting/ texting me on their exams/ academic year, I’d suggest not to worry. Minister @meudaysamant ji has been consulting all VCs and will be declaring a road map for all such students across Maharashtra in max 2 days
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 7, 2020
“आपल्या परीक्षा आणि नव्या शैक्षणिक वर्षाबाबत चिंतेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी काळजी न करण्याचा सल्ला देईन. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे यासंबंधी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी सल्लामसलत आणि चर्चा करत असून येत्या २ दिवसांमध्ये राज्यातील परीक्षा आणि शैक्षणिक वर्षासंदर्भातले हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. त्याबाबतचा निर्णय जाहीर होईल”, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी आपल्या या ट्विटमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांना दिले आहे. त्याचप्रमाणे, राज्य सरकारकडून याबाबतचा जो काही निर्णय घेतला जाईल तो निश्चितच राज्यातील सर्व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य आणि हिताचा असेल, असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.