HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे-भाजप युती होईल का? प्रविण दरेकरांचे सुचक वक्तव्य

पुणे | पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपत इच्छुक नाराज असल्याचं सांगितलं जात होतं, परंतु विभाग प्रभाग विचार करू नये, विभाग वादाला बळी पडायचं कारण नाही. अजिबात नाराजी नाही, इच्छुक प्रत्येक पक्षात असतात. तो विषय संपलेला आहे असा खुलासा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. भाजपाने सांगलीतील संग्राम देशमुख यांना पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यावरुन पुण्यातील भाजप इच्छुक नेते नाराज असल्याचं बोललं जात होतं.

याबाबत विधानसभेटे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर म्हणाले की, मेधाताई कुलकर्णी आणि आम्ही बघू. त्या प्रचारात फिरत आहेत. पक्षाला मेधाताई नवीन नाहीत, त्यांना पक्ष नाही. मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी आणि राजेश पांडे असं कोणीही नाराज नाही असं ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार भांभावलेलं आहे. शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. शिक्षणमंत्री वेगळं बोलतोय, राज्यमंत्री वेगळं बोलतोय. तीन पक्षाच सरकार असल्याने कोणाचा कोणाला ताळमेळ नाही असं दरेकरांनी सांगितले आहे.

मुंबई महापालिकेत मनसेसोबत युती करणार? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित केली होती, या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, आगामी महापालिकेत भाजपचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता, या निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना प्रविण दरेकरांनी सांगितले की, आजतरी भाजपा स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ असं सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजप युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्कायमेटच्या दाव्यानुसार गेल्या २४ तासात माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस

News Desk

महाराष्ट्रात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल !

News Desk

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला! – पंकजा मुंडे

Aprna