HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोड राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला,मुख्यमंत्री स्विकारणार ?

मुंबई | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड आज (२८ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले. दरम्यान, संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी प्रमूख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून केली जात आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राठोड आपल्या पत्नीसोबत गेले होते. यावेळी त्यांनी राजीनामा स्वतः सोबत नेला होता. मात्र, चौकशीनंतर राजीनामा घ्यावा अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केली असल्याचं समजत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का? या प्रकरणात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणुन ते काय भुमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीस आणि राज ठाकरेंकडून सहकार्याच्या आश्वासनानंतरच लॉकडाऊन जाहीर”

News Desk

उर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

बारामतीत होम कॉरंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवर हल्ला

swarit