गडचिरोली | जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात १६ जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा देशभरातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यानंतर केलेल्या ट्विट म्हटले की, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मी सलाम करतो. शहीद झालेल्या जवानांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाव देणार नाही. जवानांवर हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही असे म्हटले आहे. मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
PM Modi: Strongly condemn despicable attack on our security personnel in Gadchiroli, Maharashtra. Salute all brave personnel.Their sacrifices will never be forgotten. My thoughts & solidarity are with bereaved families. Perpetrators of such violence will not be spared (file pic) pic.twitter.com/mbkyG7XZLA
— ANI (@ANI) May 1, 2019
मुख्यमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सी-६० पथकाचे १६ जवान शहीद झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डीजीपी आणि गडचिरोली एसपींच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Anguished to know that our 16 police personnel from Gadchiroli C-60 force got martyred in a cowardly attack by naxals today.
My thoughts and prayers are with the martyrs’ families.
I’m in touch with DGP and Gadchiroli SP.#Gadchiroli— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2019
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. गडचिरोलीतील हल्ला हा भ्याड असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सांत्वना व्यक्त करतो असेही सिंह यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Spoke to Maharashtra CM Shri @Dev_Fadnavis regarding the tragic incident in Gadchiroli and expressed my grief at the loss of brave Police personnel. We are providing all assistance needed by the state government. MHA is in constant touch with the state administration. 2/2
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 1, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.