उस्मानाबाद। २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेल्या गळतीचा सर्वाधिक फटका हा उस्मानाबादला बसला होता. अनेक वर्ष सत्तेत असताना मंत्रीपद भोगलेले नेते निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणारा उस्मानाबाद जिल्हा ढासळला होता. ढासळलेल्या किल्ल्याला पुन्हा उभा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आता सरसावलेत.
आज अजित पवार उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले होते.मधल्या काळातला दौरा सोडला तर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच उस्मानाबाद दौरा आहे. गेल्या वर्षापासून महा विकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांची धावपळ सुरू होती ,सरकार पाडण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि त्यातल्या त्यात कोरोनाचे संकट म्हणून पवार बाहेर पडू शकले नव्हते.
त्यातच कोरोनाने देखील अजित पवारांना गाठलं होतं .राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापनदिन संपन्न झाल्यानंतर अजित पवारांनी आता मराठवाड्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी बीड आणि उस्मानाबाद पासून केली. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातील सत्तेमुळे अधिक भक्कम झालाय, तर उस्मानाबाद मध्ये आता पक्षाला पुन्हा उभारी द्यायची आहे असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार यांच्या दौऱ्यात मोटे यांना बळ देऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने बांधणीची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. दौर्यात अजित पवारांनी राहुल मोटे यांच्याकडे खास वेळ राखीव ठेवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील होते. मागील काही काळापासून राहुल मोटे हे फारसे सक्रिय नव्हते वने त्यांच्या येण्याने त्यांना बळ मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमधून उमटत होता. या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरूना परिस्थितीचा आढावा आणि खरीप हंगामाचा आढावा घेतला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल मोटे यांना शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले,माजी आमदार राहुल मोटे यांचे मतदार संघात वारंवार दौरे होतच राहिले.भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत आहे किंबहुना आजही ईथल्या प्रत्येक घरात कै.महारुद्र बप्पा मोटे यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते आणि त्यांचाच वारसा माजी आमदार राहुल मोटे यांनी यशस्वीपणे पुढे चालवला आहे माजी आमदार राहुल मोटे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करण्यात यावी किंबहुना महामंडळावर निवड करण्यात यावी अशा मागण्या कार्यकर्त्यांच्या वतीने सातत्याने होत आहेत तर आज होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा भेटीने निश्चितपणे माजी आमदार राहूल मोटे यांना मोठे बळ मिळणार आहे.त्यामुळे मोटे यांची विधान परिषदेवर किंवा महामंडळावर निवड होणार का…? आजच्या अजित दादा यांच्या भेटीने भूम परंडा वाशी ला काय मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.