HW News Marathi
Covid-19

पुण्यात निर्बंध कडक करणार की लॉकडाऊन? आज अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

पुणे| राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात रोज ३५ हजारांच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. पुण्यातही स्थिती गंभीर होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत बैठकीत निर्णय होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, दोन्ही मनपा पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण एसपी, वैद्यकीय अधिकारी, दोन्ही मनपा महापौर, वैद्यकीय अधिकारी, खासदार, आमदार उपस्थित असणार आहेत.

पुणेकरांनी नियमांची कडक अंमलबजावणी करा व रुग्ण संख्या कमी नाही झाली तर २ एप्रिल पासून लॉकडाऊन जाहीर करेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या बैठकीत दिला होता. या पार्श्वभूमीवर आज रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखालील होणा-या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीमुळे प्रशासकीय हालाचलींना वेग आला आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहे.या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन करायचा की निर्बंध अधिक कडक करायचे याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, असंही म्हटलं जात आहे. गेल्या वर्षभर कोरोनाने सगळ्यांनाच हैराण केलं आहे. त्यातही पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळाला. आता कुठे व्यवसाय पुन्हा रुळावर येतो ना येतो तोच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही? याबाबत आज काय तो निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

पुणे कोरोना अपडेट :

गुरुवार 1 एप्रिल 2021

◆ उपचार सुरु : 35,849

◆ नवे रुग्ण : 4,103 (2,73,446)

◆ डिस्चार्ज : 2,077 (2,32,260)

◆ चाचण्या : 20,681 (१14,99,714)

◆ मृत्यू : 35 (5,337)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कशावर कोणाचा फोटो टाकायचा ते कळत नाही का ?

News Desk

आमदारकीची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

News Desk

फडणवीस म्हणतात, ‘याच’ कारणामुळे आमच्या काळात वीजबिल थकबाकी असेल !

News Desk