HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षवाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवेन !

मुंबई | “महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक धन्यवाद”, असे ट्विट करत महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत. तर “पक्षवाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन”, असा विश्वास देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची अखेर मंगळवारी (१६ जुलै) महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे पाटील यांना ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपद देण्यात आल्यानंतर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रावसाहेब दानवे यांनी आपल्या महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर लगेच चंद्रकांत पाटील यांचे नाव महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाजपच्या नियमानुसार भाजपमधील कोणताही नेता एका वेळी २ पदे भूषवू शकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा! – ॲड.यशाेमती ठाकूर

Aprna

“…नाहीतर लवकरच राणेंचीही गच्छंती होईल”, दीपक केसरकरांचा इशारा

News Desk

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ इशारानंतर राऊतांनी ट्वीटद्वारे दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Aprna