HW News Marathi
महाराष्ट्र

तासगाव तालुक्यात  देशी दारूच्या दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र मिळणार ?

सांगली | सांगली जिल्ह्यासह तालुक्यात दारू बंदी साठी तरुणाई आणि महिला झटत असताना बलगवंडे गावात बोलावली विशेष ग्रामसभा.स्व आर आर आबा गृहमंत्री असताना डांन्सबार बंदी व दारु बंदीवर सतत झटत राहिले,पण आबांच्या तालुक्यात व त्यांच्या अंजनी गावा शेजारील गाव बलगवडे येथील अनेकांचे संसार उधवस्थ करणाऱ्या दारूच्या दुकानांना ग्रामसभा नाहरकत प्रमाणपत्र देणार का?याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान गावातील तरुणांनी आणि महिलांनी या प्रकरणाला तीव्र विरोध दर्शविला आहे. दारूबंदी असनाऱ्या गावात दारूच्या दुकानांची आवश्यकता आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. गावच्या प्रथमच लोकनियुक्त भाजपच्या सरपंचपदी महिला असल्यामुळे काय निर्णय होणार याकडे सांगली जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या महिन्यात वायफळे ग्रामपंचायतमध्ये मागेल त्याला दारु दुकानाला नाहरकत परवाना दया असा अजब निर्णय घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दप्तराविना शाळा! अनोख्या उपक्रमातून परिवर्तनाचे धडे

News Desk

राज्यातील नवनिर्वाचित २८८ पैकी २८२ आमदारांचा शपथविधी संपन्न

News Desk

राज्यात आज ३,४२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk