HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा.. शिवसेना तोंडघशी पडल्याची टीका

पी. रामदास

मुंबईः राज्य सरकारला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही समावेश असून त्यांनी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना प्रहारमधून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शिवसेनेचे नाक कापले गेल्याचा शेरा मारला आहे. शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी राणे यांना मंत्रिमंडळात घेतल्यास पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी ही धमकी धुडकावून लावत राणेंचा मंत्रिमंडळात समावशे करण्याचे संकेत दिले होते. यामुळे शिवसेना पुन्हा एकदा तोंडघशी पडली आहे, याचाच फायदा घेत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देऊन शिवसेनेवर सरसंधान केले आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात मंत्रिमंडल विस्तार होण्याची शक्यता असून त्यात राणे यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या वावड्या उठत आहेत. त्यावर येत्या दोन चार दिवसांत पडदा पडण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संत गाडगेबाबांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय, राष्ट्रवादीने केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक

News Desk

राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा- चंद्रकांत पाटील

News Desk

देवेंद्र फडणवीस यांना कोणी दिलं फिटनेस चॅलेज ?

News Desk