HW News Marathi
Covid-19

पुणे शहरात आज नवीन ३१८ रुग्णांची नोंद, एकूण संख्या ५ हजार ८५१ वर

पुणे । पुणे शहरात आज दिवसभरात नवे ३१८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात नायडू-महापालिका रुग्णालये २३६, खासगी ७१ आणि ससूनच्या ११ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या (२८ मे) ३१८ आशी रुग्णांची संख्या आहे. यानंतर आता पुणे शहरातील एकूण संख्या ५ हजार ८५१ इतकी झाली आहे.

दरम्यान, दिलासादायक बाबम्हणजे आजच्या एकट्या दिवसात २०५ रुग्ण झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत कोरोनामुक्त ३ हजार २६४ झाले आहे. आज पुणे शहरातील २०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यात नायडू-पुणे महापालिका १५७, खासगी रुग्णालये ४१ आणि ससूनमधील ०७ रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गरीब, मजूरसह शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने त्वरित ७ हजार ५००  रूपये जमा करावे, सोनिया गांधींची मागणी

News Desk

दारूची दुकाने खुली मात्र जिम बंद, हे दुर्दैवी ! फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk

कोरोनामुळे मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

News Desk