HW News Marathi
Covid-19

कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या ३० हजार जागा भरणार

मुंबई | राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा लक्षात चिंता आणखी वाझत चालली आहे. तसेच, रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची तितकीच गरज आहे. त्यामूळे राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील,’ अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ‘सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास ३० हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागात १७,३३७ जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात ११ हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. या सर्व जागा आम्ही महिनाभरात १०० टक्के जागा भरणार आहोत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत, असेही राजेश टोपे यांनी म्हटले.

लॉकडाऊनच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा मजबूत करणे आणि मनुष्यबळाची १०० टक्के व्यवस्था करणे हे ध्येय आहे. कारण लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आरोग्काय कर्ममचारी काम करत आहेत. ते थकल्यानंतर नवीन टीम असली पाहिजे. आणि अशा परिस्थितीत काही रिक्त जागा असू नयेत, याची खबरदारी घेऊन आम्ही या गोष्टी अत्यंत तत्परतेने करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus: आज राज्यात १५७६ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

जूनमध्ये लसींचा पुरवठा सुरळीत होणार, ‘सिरम’ १० कोटी डोस पुरवणार, केंद्राला लिहिले पत्र

News Desk

प्रत्येक गाव कोरोनामुक्त ठेवायचं आहे! मोदींचं जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन

News Desk