HW News Marathi
महाराष्ट्र

परदेशवारी न करताही कोरोना पॉझिटिव्ह ?

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाची लागण ही परदेशातून आलेल्या लोकांना झाली आहे. दरम्यान, ६३ जणांपैकी १२-१५ जणांना कोरोनाची लागण ही ग्रस्तांच्या संपर्कात आल्याने झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज (२१ मार्च) पत्रकार परिषदेत दिली. परंतु परदेशवारी न करता तसेच कोणत्याही परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संर्पकात न येताही एका ४१ वर्षीय पुणेकर महिलेला कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या या महिलेवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या बाबत सरकारी यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या या महिलेला सुरुवातीला श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या घशातील द्रव पदार्थांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले. कदाचित स्वाईन फ्लूची लागम झाली असेल असा अंदाज बांधत असतानाच महिलेचा स्वाईन फ्लूचा अगवाल निगेटिव्ह आला मात्र कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.

या महिलेने कुठे परदेशात प्रवास केला होता का किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या सहवासात होती का याची तपासणी केल्यानंतर तसे काहीही नसल्याचे आढळून आले. मग तिला कोरोनाचा संसर्ग कसा झाला, याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. दरम्यान, या कोरोनाबाधित महिलेवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ते’ अन्य पक्षातून भाजपमध्ये स्वार्थासाठीच येतात, मात्र…!

News Desk

मनसेचे पक्ष बांधणी सुरू, या ‘३’ नेत्यांची कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती

News Desk

आर्यन खान प्रकरणात मनीष भंगाळेंची एन्ट्री, व्हॉट्सॲप हॅकींगसाठी ५ लाखांची ऑफर

News Desk