HW News Marathi
महाराष्ट्र

अवैध धंदे बोकाळल्याने महिला संतप्त

विनोद तायडे

वाशिम- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील बिअर बार आणि देशीदारुचे दुकाने बंद झाल्यापासून गावोगावी खेडोपाडी अवैध देशिविदेशी दारू विक्रीला उत आला आहे. रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलखेडा येथे कायदयाला खो देत वाशिम रिसोड रस्त्यालगत असलेल्या एका धाब्यावर राजरोसपणे देशी-विदेशी दारूची विक्री होत आहे. आसेगाव पेन येथे अवैध देशिदारू विक्रीसह वरली मटका राजरोसपने सुरू आहे. रस्त्यालगत एका घरामध्ये देशीदारूची सर्रास विक्री होत आहे. घरामध्येच मद्यपींची बसण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या अगदी रस्त्यालगतअवैध धंदे सुरू असताना पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. दारूपाई गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत असताना पोलीस मात्र हप्ता घेवून सर्वच अवैध धंद्याकडे डोळे झाक करीत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. आसेगाव येथील महिलांनी संसार वाचविण्यासाठी सरपंच, तंटा मुक्तसमिती अध्यक्ष, पोलीस पाटील यांच्यासह पोलिसांना मदत मागितली पोलिसांना हप्ते मिळत असल्याचा आरोप करत शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या व दारू बंद करणयासाठी निवेदन दिले .गावातील व बेलखेडा धाब्यावरील अवैध धंदे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी निवेदनातून दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’, चर्चा तर होणारच!

News Desk

“अजितदादा, जयंत पाटील, मुनगंटीवार, विखे-पाटील आणि मला चित्रपटात भूमिका द्या”- गिरीश महाजन

News Desk

मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही – अनिल देशमुख

News Desk