टोक्यो | भारतीय महिला हॉकी संघाला पराभव पतकरावा लागला आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश करत भारताच्या महिलांच्या हॉकी टीमनं इतिहास रचला होता. या मॅचमध्ये अर्जेंटीनानं भारताचा २ -१ ने पराभव केला आहे.
भारताच्या गुरजीत कौरनं केला पहिला गोल
महिला हॉकी संघाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीने झाली होती. या मॅचमध्ये भारताच्या गुरजीत कौरनं पहिला गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. गुरजीतनं पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. या गोलमुळे पहिल्या क्वार्टरमध्ये भारतानं अर्जेंटीनावर आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटीनानं गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही टीमनं भक्कम बचाव करत एकमेकांचे पेनल्टी कॉर्नर रोखले. पहिल्या हाफनंतर दोन्ही टीम १-१ ने बरोबरीत होत्या. तिसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटीनानं आक्रमक सुरुवात केली. भारताच्या गोल क्षेत्रात त्यांनी सातत्यानं हल्ले केले. याचा फायदा अर्जेंटीनाला झाला. अर्जेंटीनानं दुसरा गोल करत आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस अर्जेंटीनाकडं २-१ अशी आघाडी होती.
#TokyoOlympics | Indian women's hockey team lose against Argentina in the semifinal match, to take on Great Britain in bronze medal clash pic.twitter.com/HJcZwP8jfZ
— ANI (@ANI) August 4, 2021
चौथ्या क्वार्टरमध्ये भारतानं गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. मॅच संपण्यास १० मिनिटं बाकी असताना भारताला गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र त्यावेळी अर्जेंटीनाच्या गोल किपरनं तो प्रयत्न रोखला. त्यानंतरही भारतानं गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. आता भारतीय टीमला ब्रॉन्झ मेडलसाठी खेळावं लागणार आहे.
अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा खेळाडू
कुस्तीपटू सुशील कुमार २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत याआधी पोहोचला होता. एकीकडे कुस्तीमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा रवी कुमार दहीया पाचवा खेळाडू ठरला असताना दुसरीकडे फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५७ वजनी गटामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा रवीकुमार दहीया हा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे.
भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन पदके
भारत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमालीची कामगिरी करत आहे. लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना तिसरी बॉक्सर बनली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सरसमोर मात्र, लोव्हलिनाने चांगली लढत दिली. लोव्हलिनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत.
कमलप्रीत कौरला कांस्यपदक
टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंग आणि बॅडमिंटनमध्ये पदक मिळवलं असून आज अॅथेलिटक्स खेळातील पहिलं वहिलं पदकही मिळण्याची आशा होती. डिस्कस थ्रो स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर हिने फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र अंतिम स्पर्धेत ती खास कामगिरी करु शकली नाही. ज्यामुळे तिला सहाव्या स्थानावर समाधान मानाव लागलं. सहा प्रयत्नांत ६३.७० मीटर हा तिचा सर्वोत्कृष्ठ थ्रो ठरला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.