HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधान झालेलेही पाहायला आवडेल !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूकही भाजप-शिवसेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून अद्याप शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरुच असल्याचे चित्र आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून राजकारण तापलेले असताना दुसरीकडे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी वेगळेच विधान केले आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री काय तर पंतप्रधान झालेलेही पाहायला आवडेल”, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

“मित्र पक्षाने आम्हाला धमक्या देण्याच्या फंदात पडू नये. युती असेल तर सोबत, नाहीतर आमचंही ठरलंय.उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीच काय तर पंतप्रधान झालेले देखील पाहायला आवडेल, असे विधान तानाजी सावंत यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. सध्या भाजपच्या अनेक नेत्यांकडून पुढचा मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार असा दावा केला जात आहे. तर शिवसेनेकडून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा दावा केला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पुढचा मुख्यमंत्री देखील आपणच होणार असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अशा पद्धतीने मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना-भाजपकडून दररोज वेगवेगळे दावे केले जात असताना तानाजी सावंत यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी

News Desk

फडणवीसांची उंची मोदी आणि सह्याद्रीपेक्षा जास्त म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत,राऊतांची टोलेबाजी

News Desk

आर्थिक संकट लक्षात घेता, येत्या काळात वैयक्तिक जीवनात काटकसरीने काम करा !

swarit