HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive | धनंजय मुंडेंची तशी काही कामगिरी दिसली नाही…

मुंबई | देशात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे त्यामूळे सगळेच जण सक्तीने घरी बसले आहेत. सगळेच जण वर्क फ्रॉम होम करत आहेत आगदी राजकीय नेतेही वर्कफ्रॉम होम करत आहेत. घरी असल्याकारणाने आपल्या मतदार संघाशी राजकीय व्यक्ती कशा जोडून आहेत हेच जाणून घेण्यासाठी एच.डबल्यूच्या आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी भाजपच्या माजी आमदार पंकडा मुंडे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे बातचीत केली. पहिल्यांच तुम्ही घरी आहात का आणि आपल्या मतदार संघाशी कशा जोडल्या आहात असा प्रश्न विचारला असता त्यांनी, मी परळी वरुन काही कामानिमित्त मुंबईला आलेले आणि मोदींनी जेव्हा लॉकडाऊन घोषित केला तेव्हापासून मी इथेच आहे. आणि सध्या माध्यमांमूळे, टेक्नॉलोजीमूळे इतकं जोडता येतं लोकांशी की मी सतत सतर्क आहे. वेळोवेळी लॉकडाऊन, कोरोना, यासंबंधी ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्यावर सातत्याने मी ट्विट करत आहे आणि माझ्या सतदार संघाशी जोडले आहे.

बीड जिल्ह्यातील प्रशासनाने कोरोनाशी खुप चांगल्य पद्धतीने सामना केला आहे त्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी, अशावेळी पालकमंत्री असल्याचा किंवा माजी मंत्री असल्याचा फायदा होतो. मी प्रशासनाच्या, कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेच. त्यानंतर आत्ताचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारला असता, ते पालकमंत्री झाल्यापासून विशेष काही कामगिरी बघण्याची संधी मिळाली नाही असा टोला त्यांनी बंधु धनंजय मुंडे यांना लगावला. तसेच, त्यांनी तशी कामगिरी केली तर कौतुक मी नक्कीच करेन. या आधी जेव्हा मी मंत्री होते आणि ते विरोधी पक्षात होते तेव्हाही त्यांनी माझ्यावर टीका केल्या होत्या पण मी कधी काही बोलले नाही, मात्र अजूनतरी तशी काही कामगिरी त्यांची दिसत नाही आहे. जर दिसली तर कौतुक नक्कीच करेन, असे पंकजा मुंडे यांनी एच.डबल्यूशी बातचीत करताना म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान, संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची भाजपची मागणी

News Desk

करीरोडच्या अविघ्न पार्कला भीषण आग, एकाचा मृत्यू

News Desk

सोमय्यांची अडवणूक करु नका, त्यांना येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन

News Desk