HW News Marathi
महाराष्ट्र

अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत !

पुणे | पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील चहाप्रेमींचे हक्काचे ठिकाण म्हणजे ‘येवले अमृततुल्य’. मराठी व्यावसायिकाकडून ‘चहा’चा ब्रॅंड करुन राज्यात अनेक ठिकाणी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. “ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून पैसे कमावण्यापेक्षा आम्ही उपाशी राहू. मात्र कोणाच्याही अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत. मेलामाईन व कलर हे घातक पदार्थ चहात टाकून विकण्याची गरज नाही. आमच्या येवले अमृततुल्य या ब्रँडला तब्बल ४०,००० हून अधिक लोकांची मागणी आहे, परंतु केवळ गुणवत्ता टिकवण्यासाठी आम्ही आतापर्यंत फक्त २२० फ्रँचाइसी दिल्या आहेत. यावरूनही आमचा केवळ पैसे कमावणे हा उद्देश दिसून येत नाही. केवळ फ्रॅंचायज़ी वितरित करणे हे आमचे उद्दिष्ठ नसून जास्तीत जास्त उद्योजक घडवणे व रोजगार निर्मिती करणे हे ध्येय आहे”, असे स्पष्टीकरण येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले यांनी काल (३० जानेवारी) पत्रकार परिषदेत दिले.

आमच्या कोणत्याही पदार्थात मेलामाईन, कलर किंवा इतर काही भेसळीचे घटक वापरले नाहीत, वापरत नाही आणि वापरणार सुद्धा नाही. एफ.डीए.ने सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची न्यायालयीन कारवाई अजूनपर्यंत येवले यांच्यावर झाली नसून तसे कारवाईचे पत्रही मिळाले नसल्याची माहितीही त्यांनी दिली. लोकांना चांगल्या दर्जाची सेवा, गुणवत्तापुर्व पदार्थ योग्य दरात विकण्याबरोबरच त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. मात्र सोशल मिडीया आणि इतर ठिकाणी पसरवल्या जाणा-या चुकीच्या बातम्यांमुळे त्याचा परिणाम व्यवसायावरती तर होतोच त्याबरोबर कामगार वर्गांवर व त्यांचा कुटुंबावर सुद्धा होतो.

या पत्रकार परिषदेस येवले अमृततुल्यचे संस्थापक तेजस येवले व नवनाथ येवले यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी येवले अमृततुल्यचे कायदेशीर सल्लागार सुधीर रेड्डी,सोनाली परब व कंपनीचे प्रतिनिधी आम्रपाली मोरे व अल्पा कंदगुळे आणि टीम उपस्थित होती. या परिषदेतून कोणत्याही अफवांवर अगर चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. अफवांप्रमाणे आम्ही कोणतेही कृत्य केलेले नाही व आम्ही आमच्या ब्रँड नावाप्रमाणेच ” येवले अमृततुल्य” अश्या अमृताची ग्राहकांना सेवा देतो असं आवाहनही त्यांनी ग्राहकांना केले. अशाप्रकारे जर मराठी व्यावसायिक स्वत:च्या कष्ठाने नावारुपाला येत असेल आणि त्याला खाली खेचण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. यातच असे दिसून येते कि येवले अमृततुल्यचे यश सामावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला लोकसभा निवडणुकीची चिंता नाही | शरद पवार

swarit

भीमा-कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेतले, गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

swarit

विधानपरिषदेवर पाठवत नसल्याने सचिन सावंत फार निराशेतून बोलतात, फडणवीसांचा सावंतांना टोला

News Desk