HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

कोरोना काळात ऑक्सिजन निर्मितीसाठी योगी सरकार राबवणार “शरद पवार पॅटर्न”!

उत्तर प्रदेश | कोरोना महामारीचा सामना संपूर्ण जग करत आहे. अशात भारतातही कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पर्यायी औषधे, बेड्स, ऑक्सिजन या सगळ्यांचा तुटवडा जाणवत आहे. अशात आता योगी सरकार ऑक्सिजन निर्मितीसाठी शरद पवार पॅटर्न राबवणार आहे.

शरद पवारांचा आपत्ती व्यवस्थापन बाबतीत जो दृष्टिकोन आहे तो खूप मोठा आहे. त्यांना कोणत्या वेळी नेमके काय केलं पाहिजे हे खूप चांगल्या प्रकारे समजते. त्यांनी अडचणीच्या वेळी उभा राहत परिस्थितीवर मात कशी केली पाहिजे याचे जगाच्या समोर उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. कोरोनाच्या परिस्थिती मध्ये सुद्धा असाच त्यांनी जो दिशादर्शक निर्णय घेतला त्याचे अनुकरण हे उत्तर प्रदेश करताना दिसत आहे.

महाराष्ट्र राज्य कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत जो विचार करते तो विचार दिशादर्शक असतो. आजपर्यंत देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे याची अनुभूती वेळोवेळी आली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सरकार जो प्लॅन ऑक्सिजन बाबतीत राबवणार आहे त्याबाबतीत उत्तर प्रदेश विचार करत आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातून ऑक्‍सिजन निर्मितीचा प्रकल्प यशाच्या अंतिम टप्प्यावर आहे. धाराशिव साखर कारखान्यातून येत्या दोन तीन दिवसांत वैद्यकीय ऑक्‍सिजन प्रकल्प सुरू होईल. साखर कारखान्यातील इथेनॉल प्लांटमधून वैद्यकीय दर्जाचा ऑक्‍सिजन तयार करण्याचा देशातील पहिली चाचणी उस्मानाबद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने सुरू केली आहे. एकदा हा प्रकल्प यशस्वी झाला की राज्यातील सर्व कारखान्यात तो राबवला जाणार आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अल्कोहल तंत्रज्ञान आणि जैविकइंधन विभागातील शास्त्रज्ञ प्रा. संजय पाटील यांन सिांगितले की, उत्तर प्रदेश सरकारच्या साखर आयुक्तांनी या पथदर्शी प्रकल्पाचा तपशील मागवला होता. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक मोठे राज्य आहे. या राज्याचे ऑक्सिजन तुटवड्या वर उपाय म्हणून आम्हालाही या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे अशा हेतूने सहभागी होण्यास अनुकूलता दर्शविली आहे.

Related posts

Union Budget 2021 |  निर्मला सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात

News Desk

जवानांना मोबाईलमधून ८९ अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचे लष्कराचे आदेश

News Desk

“श्रीराम बोले मै कहाँ बडा, मै तो बीजेपी के मॅनिफेस्टो मे पडा”, सत्यजित तांबेंनी शेअर केला व्हिडिओ

News Desk