HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभेकरिता योगी आदित्यनाथ यांची मुंबईत सभा

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात आज (१० ऑक्टोब) दिग्गज नेत्यांची प्रचार सभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जयंत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील महाराष्ट्र जाहीर सभा होणार आहेत.

शिवसेना-भाजप महायुतीने प्रचारात आघाडी घेतली असून आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही महाराष्ट्राच्या प्रचारात उतरणार आहेत. मुंबईत कुलाबा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचारासाठी काळाबादेवी येथे आज दुपारी ३ वाजता आणि कांदिवली येथील अतुल भातखळकर यांच्यासाठी सायंकाळी ६ वाजाच्या सुमारास जाहीर सभा घेणार आहेत.

मुंबईतील दोन सभांबरोबरच आणखी दोन सभा त्यांच्या राज्यात होणार आहे. रावेरमध्ये हरिभाऊ जावळे यांच्यासाठी तर परभणी येथे शिवसेना उमेदवार डॉ. राहुल पाटील आणि विशाल कदम यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या बातम्या खोट्या । आनंदराज आंबेडकर

News Desk

नांदेड : कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार जाहिर

News Desk

राज्यपालांना शिफारस केल्यानंतर; आज विधानभा अध्यक्षाची निवड होणार का?

Aprna