HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

तुम लाख कोशिश करो मुझे हराने की,बदनाम करने की …मुंडेंनी शायरीतून ठणकावलं !

सांगली | धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांनंतरही त्यांचा राजकीय झंझावात सुरू आहे.सभा ,दौरे या माध्यमातून सध्या ते राज्यभर फिरत आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमाला आल्यानंतर “मी कधीच माझ्या जीवनात भान हरपून बोललेलो नाही. भान ठेवूनच बोललो आहे,” असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या मुंडेंनी या कार्यक्रमादरम्यान शेरोशायरी म्हणत अनेक इशारे दिले. यावेळी मुंडेंनी भाषण केले. या भाषणादरम्यान धनंजय मुंडेंनी त्यांच्या आवडती शायरी म्हटली. “तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, बदनाम करने की, मै जब जब बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ” अशी शायरी धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटली.त्यामुळे आपल्याला हरवण्यासाठी बदनाम करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी आपण अधिक तीव्रतेने पुढे जाऊ हेचं विरोधकांना ठणकावून सांगण्याचा प्रयत्न सध्या मुंडे करत आहेत.

Related posts

विकास दुबेचे २ साथीदार अटकेत, दया नायक यांनी केली कारवाई

News Desk

….नाहीतर आता पूर्ण लॉकडाऊन अटळ ! । छगन भुजबळ

News Desk

यंदा मॉन्सून वेळेत दाखल होणार