HW News Marathi
देश / विदेश

‘कोरोना’ संसर्गाने ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा स्वेच्छेने ‘होम क्वारंटाईन’ व्हा !

मुंबई | ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ हे दोनच पर्याय आताच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ संसर्गाने ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेने ‘होम क्वारंटाईन्‌’ व्हा. स्वत:चे आणि कुटुंबाचे संरक्षण करा”, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. “जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील”, असा इशारा यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे, आज (२ एप्रिल) राज्यात रामनवमीचा सण भक्तीभावाने, साधेपणाने साजरी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले मानताना यापुढेही सर्व सण असेच साजरे व्हावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘कोरोना;बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढत आहे, भाजीबाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोरोना’संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल. त्याची सुरुवात कालपासूनच झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत. परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असाही इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला आहे. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये. त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहाच्या मुलाविरोधातील केस प्रशांत भूषण लढणार

News Desk

‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे – अजित पवार

Arati More

दहशतवाद वाढविणाऱ्या देशांविरोधात एससीओ सदस्य देशांनी एकत्र यावे !

News Desk