HW News Marathi
महाराष्ट्र

“एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करून द्या”, तरुणाची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | कोरोनाच्या या कठीण काळात अनेकांचे रोजगार गेले. ज्यांचे हातावर पोट होते त्यांनी अनेक संकटांचा सामना करावा लागला. संकटकाळात अनेकांचे रोजगार गेले, सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले, या लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अनेक जणांनी पत्र लिहत आपल्या व्यथा सांगतल्या. आता एका तरूणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं असून या पत्रातील मजकुरामुळे ते प्रचंड व्हायरल होत आहे.

वाशिममधील युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करून द्या अशी अनोखी मागणी केली आहे. गजानन राठोड असं या युवकाचं नाव आहे, या पत्रात गजानननं म्हटलंय की, माझं वय ३५ वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही, त्याचं कारण गेल्या ७ वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, परंतु कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही, जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते.

तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत, त्यामुळे जॉब मिळणेही कठीण झालं आहे, त्यामुळे मला एकतर जॉब द्यावा अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे अशी अजब मागणी गजानन राठोडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधीही अनेकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या व्यथा कळवल्या होत्या, यात लहानग्या चिमुकल्यांनीही लिहिलेली पत्र भावनात्मक होती तर काहींची मागणी ऐकून हसू आवरत नव्हते.

बीडमधील एका तरूणाने मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दोन वर्षापूर्वी लिहिलं होतं, मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या तरूणाने ही मागणी केली होती, तसेच त्याच्या मूळ गावापासून लालबागच्या राजापर्यंत दंडवत घालत पायी यात्राही काढली होती. हा तरूणही त्यावेळी जोरदार चर्चेत आला होता, आता वाशिमच्या युवकाने केलेल्या मागणीही जोरदार व्हायरल होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परब यांना तिसरा धक्का! राज्यपालांनी दिले हे आदेश

News Desk

जळगावात भाजपला धक्के सुरुच, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ३ नगरसेवकांचे हाती शिवबंधन

News Desk

“कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाने हानी”, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna