HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

उदयनराजेंच्या मंत्रिपदासाठी तरूणाने लिहिले रक्ताने पत्र …..

सातारा | साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावे म्हणून चक्क एका तरुणाने आपल्या रक्ताने गृहमंत्र्यांना पत्र लिहीले आहे . उदयनराजे यांच्यावर प्रेम करणारा बोंडारवाडी (ता. सातारा) येथील युवक नीलेश सूर्यकांत जाधव याने स्वतःच्या रक्ताने उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रीपद मिळावे, ही मागणी करणारे पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे.

मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.उदयनराजेंना केंद्रात पाठवण्याचा निर्णय नक्की झाला, तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांची खासदारकी अडचणीत येऊ शकते. कारण दोघांपैकी एका जागेवर भाजप उदयनराजेंना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

त्याच पार्श्वभूमिवर नीलेशचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे . या पत्रात त्याने म्हंटले की, आमच्या घरी माझ्या आजोंबापासून छत्रपती उदयनराजे भोसले व त्यांच्या कुटुंबांवर आमचे प्रेम आहे. माझेही राजेंवर खूप प्रेम आहे. उदयनराजेंना केंद्रात मंत्रीपद मिळावे अशी माझी इच्छा आहे. ती  मी माझ्या रक्ताने मांडली आहे, असे त्याने लिहिले आहे.

Related posts

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरू !

News Desk

कोल्हापुरात पूर, मुंबई चिंब

News Desk

माझा पक्ष रजिस्टर असूनही आम्ही भाजपच्या चिन्हावर का लढायचे ?

News Desk