HW News Marathi
महाराष्ट्र

“तुमचा पराभव बगलबच्च्यांच्या उद्योगांमुळे झाला”, शिवेंद्रराजेंची शशिकांत शिंदेंवर जहरी टीका!


सातारा। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल नुकताच लागला आणि या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागून होत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना फक्त एका मतानेच मोठा पराभव सहन करावा लागला. आणि हा पराभव शशिकांत शिंदे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर आरोप केले होते. मला पाडण्यात संपूर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात असून त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केली, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता. शिंदेंच्या या गंभीर आरोपांवर आता भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी चांगलच उत्तर दिलं आहे.

तुमचा पराभव हा तुमच्या बगलबच्च्यांच्या उद्योगांमुळे झाला

या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं होतं त्यांनतर मात्र भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर एका मेळाव्यात गंभीर टीका केली आहे. तुमचा पराभव हा तुमच्या बगलबच्च्यांच्या उद्योगांमुळे झाला आहे. त्यांना तुम्ही आवरलं असतं तर तुमचा पराभव झाला नसता, अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे.आम्हाला हिशोब चुकता करायच्या धमक्या देऊ नका. हिशोब चुकता करायची वेळ आली तर आम्ही पण साता-यातच जन्मलोय. तुमच्या मुंबईच्या गुंडांना आमचा हिशोब परवडायचा नाही, असा इशारा शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदे यांना दिलाय. तसंच, षडयंत्राची भाषा शशिकांत शिंदे यांनी करु नये. आम्ही कोणतंही षडयंत्र केलं नसल्याच सांगत तुमची दहशत किती आहे. हे आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यालयावर केलेल्या दगडफेकीतुन बघीतल आहे. तुम्हाला माहित असल्याशिवाय हे

दगडफेकीचं कृत्य घडूच शकत नाही, असा आरोपही शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.

शशिकांत शिंदे यांचा आरोप

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला पाडण्यात संपुर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात असुन त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केल्याचा मोठा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांनी हा आरोप केला आहे. राष्ट्रवादीतुनच विरोधकांना मदत होते याची खंत बोलुन दाखवत साताऱ्यातील मुख्य नेतेच विरोधकांना सोबत घेवून खलबत करतात त्यामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितल आहे, यावेळी त्यांचा रोख हा रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय! – मुख्यमंत्री

Aprna

ठाकरेंची सून होण्यापेक्षा राज ठाकरेंच्या मनसेची कार्यकर्ती होणं कठीण- शालिनी ठाकरे

News Desk

दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला

News Desk